महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, शिवसेनेची नितीन गडकरींकडे ऑनलाइन तक्रार दाखल ;


भुसावळ (प्रतिनिधीी )-
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाहीय. खडी, गिट्टी, मुरूम रस्त्यावरच आहे तसेच काही ठिकाणी एकाच रस्त्यावर दुहेरी वाहतूक चालू असल्यामुळे नागरिकांचा अपघात होत आहे. काम सुरू असतांना वर्क इन प्रोग्रेस अश्या सूचना फलक लावणे गरजेचे असते, ह्या नियमांचा विसर प्राधिकरणाला पडला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत या अपघातांची गांभिर्याने दखल घेण्यात आली नसून अद्याप अपघातांची मालिका कायम सुरू आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्यावर सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी रस्ते व अवजड वाहतूक केंद्रीय मंत्री ना . नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार ऑनलाइन दाखल केली आहे.
रस्ता सुरक्षेचा प्राधिकरणाला विसर:
कमी पावसाने रस्त्यावर चिखल झाला तर अधिक पावसात काय परिस्थिती राहील? रस्त्यावर व कडेला कायम खडी, गिट्टी किंवा माती पडलेली असते त्यावरून अपघात होत आहेत. खड्डे केलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नाही, फलक सुदधा नाहीत. महामार्गालगत असलेल्या संलग्न रस्त्यांची दुरावस्था झाली, तरी त्याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जाते असे तक्रारीत नमूद केलेले आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये अनेक अपघातांची नोंद झाली असून नागरिकांचा जीव गेला आहे. वेळोवेळी सूचना दिल्यावरसुद्धा प्राधिकरण झोपेचे सोंग घेत आहे. त्यांना नागरिकांच्या जीवाशी काहीही देणेघेणे नाही. वेळीच उपाययोजना न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.

  • प्रा.धिरज पाटील, शिवसेना तालुका संघटक

दुतर्फा खोदलेल्या रस्त्यामुळे अंधारात खड्डयात पडलो, नाकातून रक्त वाहत होते. प्रवाश्यांनी डॉक्टरांकडे दाखल केल्यावर नाकाचे हाड तुटल्याचे समजले, संचारबंदी असल्याने काम नाही, त्यात आता उपचारासाठी मोठी रक्कम खर्च होईल. महामार्ग प्राधिकरणाने उपचारासाठी भरपाई द्यावी.

  • सोपान वराडे, अपघातग्रस्त प्रवासी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *