वरणगाव –
राष्ट्रीय महामार्गाच्या फुलगाव जवळील नवीन उड्डान पुलावर तळवेळ येथील तिघे मित्र मोटर सायकलने जात असताना अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत तिघेही मित्र ठार झाल्याची हृदयद्रावक घटना दि २६ मंगळवार रोजी दुपारी घडली .

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तीघे मित्र मोटर सायकल क्र एम एच १९ यु ७८६३ ने भुसावळ कडून घरी तळवेल कडे जात असताना राष्ट्रीय महामार्गाच्या फुलगाव जवळील नवीन उड्डान पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकला जबर धडक दिल्याने मोटरसायकलस्वार विवेक सुनिल पाटील ( १६ ) यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला तर , श्याम राजेंद्र पाटील ( १६), देवानंद सोपान पाटील ( १७ ) या दोघा मित्राना जखमी अवस्थेत उपचारासाठी जळगाव येथील गोदावारी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचाही यात मृत्य झाला आहे
तिघ मित्र हे त्याचा घरात एकुलते एक असल्याने तळवेल गावात शोककळा पसरली आहे.


