भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागातर्फे ” आजादी का अमृत महोत्सव ” या संकल्पने मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्षे झाली आहेत त्या निमित्ताने ह्या वर्षात देशभर ‘आजादी का अमृत महोत्सव’ या संकल्पने मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. ह्या कार्यक्रमासाठी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये रेल्वे कर्मचारीमध्ये एम जे साळुंखे, अजित पाठक, डी एन सिंग, दीपा स्वामी आणि भावना झा यांचा समावेश होता .
सर्व वक्त्यांनी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातत्र्योत्तर भारताच्या स्थिती आणि प्रगतीचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एन डी गांगुर्डे सीनि डी पी ओ यांनी वक्त्यांचे त्यांच्या सादरीकरणासाठी अभिनदन केले. विश्वाच्या सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय क्षेत्रात भारताचे आजचे स्थान अव्वल आहे असे प्रतिपादन केले. स्पर्धेसाठी परीक्षक विकास धूर्वे लॉ ऑफिसर, सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल हे होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्मिक विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



