जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत 511 रुग्ण आढळले जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 64 हजार 543 वर : आतापर्यंत 58 हजार 535 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1404 रुग्णांचा मृत्यू ;


जळगाव –
जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 511 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 543 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 58 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 404 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 313 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू ओढवला.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 267
जळगाव ग्रामीण 12
भुसावळ 31
अमळनेर 01
चोपडा 38
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 16
यावल 02
एरंडोल 07
जामनेर 78
रावेर 06
पारोळा 06
चाळीसगाव 12
मुक्ताईनगर 21
बोदवड 14
अन्य जिल्हा 00

24 तासात एका रुग्णाचा मृत्यू
गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 57 वर्षीय पुरूषाचा मानस हॉस्पीटल, जळगाव येथे मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *