साईलीला महिला बचत गटाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साईलीला महिला बचत गटाकडून रानातला महादेव मंदीर येथे ७ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
इंडियन रेड क्रॉस सोसायटी च्या मदतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्तचा तुटवडा भासत आहे ही बाब लक्षात घेऊन हे रक्तदान शिबिर घेण्यात आले .
शिबिराचे उद्घाटन कु. किमया भंडारी व लावण्या राणे या बालिकांच्या हस्ते करण्यात आले . गटाच्या अध्यक्षा सौ जास्वंदी भंडारी सदस्या संध्या चौधरी यांनी स्वतः रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली.
पत्रकार संजय सिंग चव्हाण, छायाबाई कोरे, अमित भगुंडे, मयूर फिरके, रेखा फालक , एडवोकेट तुषार पाटील, डॉक्टर नितीन यावलकर यांनी रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांना रेड क्रॉस सोसायटी कडून प्रमाणपत्र व गटाकडून रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच खिचडी वाटप करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी ॲड जास्वंदी भंडारी , सुनिता अ. राणे, नेहा यावलकर, हर्षदा चौधरी, वैशाली हिरे, संध्या चौधरी ,मनीषा भंडारे, सुनंदा खरे प्राजक्ता गंधे, वैशाली चौधरी , अनिता राणे,सुनिता सु. राणे अजय नागराणी , उत्कर्ष भंडारी, दिनेश गवळी, अतुल गुरव, व इतर यांनी मेहनत घेतली. तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉक्टर शंकरलाल सोनवणे, सीमा शिंदे, रूपाली बडगुजर, मंगेश ओतारी व अनंवर खान यांचे सहकार्य लाभले.



