रेल्वे ईसीसी सोसायटीमार्फत कर्ज वितरणात पक्षपतीपणा : व्ही. के. समाधीया

भुसावळ (प्रतिनिधी )-
कामगारांसाठी स्थापन केलेल्या सोसायटीने कामगारांना वेळेवर कर्ज देणे ही सोसायटीची जबाबदारी आहे. मात्र तेथील कर्मचारी पक्षपातीपणा करतात. अगोदर दोन तीन दिवसात कर्ज मंजूर केले जात होते. मात्र आता जे एनआरएमयु चे सदस्य नाहीत, त्यांना बारा ते पंधरा दिवस कर्ज मंजुरीसाठी लागत असल्याने यात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप सीआरएमएस जे मंडळ अध्यक्ष वी. के. समाधीया यांनी केला.

सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन यांच्या कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी मंडळ सचिव एस. पी. पाटील, पीओएच ब्रांच अध्यक्ष किशोर कोलते, मंडळ संघटक पि.के. गायकवाड, मंडळ समनव्यक एस. के. दुबे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना समाधिया म्हणाले की, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ईसीसी सोसायटीची स्थापना करण्यात आली. मात्र ऐन कोरोना काळात कामगारांना आवश्यकता असताना ही सोसायटी बंद करण्यात आली होती. तेव्हा सीआरएमएस ने हा मुद्दा उचलून सोसायटी सुरू झाली, याचे संपूर्ण श्रेय हे सीआरएमएस ला मिळाले.
सध्या सोसायटी मध्ये ऑनलाईन सिस्टीम असल्याने केवळ एक दिवसात कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र कामगारांना एक दिवस तर सोडाच आठवडाभरात देखील कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. यावर सी आर एम एस च्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला होता, कामगारांच्या समस्यांना वाचा फोडणे हे गैर नसून ही आपली जबाबदारी आहे. याचा येणार विसर त्यांना पडला असून ते संस्कारहीन झाले आहेत. त्यामुळेच कामगारांच्या विरोधात काम करीत असल्याचे श्री. समाधिया यांनी सांगितले. तसेच महापुरुषांच्या जयंतीला चप्पल घालून पुष्पहार अर्पण केला त्यामुळे यांना महापुरुषांची सुद्धा जाण असल्याचे दिसून येते. सोसायटीच्या मूलभूत सिद्धांताचे उल्लंघन केले जात असून कामगारांच्या समस्यांशी त्यांना कुठलेही देणेघेणे नसल्याचे समाधीया म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *