मुंबई ते गोरखपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या धावणार –


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने मुंबई व गोरखपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणे-
01081 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ३.३.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी १६.४० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.
01082 साप्ताहिक विशेष गोरखपूर येथून दिनांक ५.३.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी १६.०५ वाजता सुटेल लोकमान्य टिळक टर्मिनस दुसर्‍या दिवशी २३.४५ वाजता येथे पोहोचेल.
थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी (केवळ 01082 साठी), पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिओकी, मिर्जापूर, वाराणसी, औनिहर, मऊ, भटनी आणि देवरिया सदर
संरचनाः एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, चार वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 3 द्वितीय श्रेणी आसन.
आरक्षण: पूर्णपणे आरक्षित असलेल्या 01081 विशेष गाडीचे बुकिंग सामान्य भाडे दराने दिनांक २८.२.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल.
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *