कोल्हापूर ते नागपूर दरम्यान धावणार द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने कोल्हापूर ते नागपूर दरम्यान द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणे –
01404 द्वि साप्ताहिक विशेष श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दिनांक १२.३.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी १२.४५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्‍या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
01403 द्वि-साप्ताहिक विशेष नागपूर येथून दिनांक १३.३.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार आणि शनिवारी १५.१५ वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे दुसर्‍या दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
थांबे: मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी
संरचनाः एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, तीन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, १० शयनयान, ५ द्वितीय श्रेणी आसन.
आरक्षणः पूर्णपणे राखीव असलेल्या 01404/01403 विशेष गाड्यांचे बुकिंग सामान्य भाडे दराने दिनांक १.३.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *