राष्ट्रीय दलित पँथरतर्फे विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सरकारने दिवसें- दिवस घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे भाव वाढवून सामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आणली आहे. यासाठी राष्ट्रीय दलीत पॅथर आक्रमक झाले असून सरकारने वाढते भाव नियंत्रणात आणावे यासह विविध मागण्यांबाबत भुसावळ तहसीलदार यांना आज दिनांक २६ रोजी निवेदन देण्यात आले आहे.
भाजपा सरकारच्या काळात घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगन भरारी घेत आहे.यामुळे सर्व सामान्यांना जगणे कठीण झाले. कोरोनाच्या काळात नागरिकांना दोन वेळचे जेवणही नशीब नव्हते त्यात सरकारने भाव वाढ करून भर टाकली आहे.
तसेच भुसावळ पंचायत कार्यक्षेेत्रातील वराडसीम,शिंदी, किन्ही,पिपंळगाव या ग्रा.पं लेखा परिक्षण 4 वर्षापासून केलेले नाही हे गंभीर बाब असुन याला जबाबदार विस्तार आधीकारी आहे यांचेवर योग्य कारवाई करावी
जाडगांव ग्रा.पंचायत नेहमी बंद असते त्यामुळे नागरीकाचे कामे होत नाही याला जबाबदार ग्रामसेवक अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हान मृत्यूची लॅपटॉपची सुद्धा
सी.बी. आय.चौकशी करण्यात यावी.
जामनेर तालुक्यातील नवीन माल ढाबाडी सिमा वानखेडे हिला आत्महत्यास प्रवृत्त केल्यास त्या नारधामास कठोर कारवाई करण्यात यावी.
भुसावळ नगरपालिकेतर्फे सक्तीची वसुली ढोल -ताशे वाजवून करीत आहे ती थांबविण्यात यावी.या विविध मागण्या करण्यात आल्या असुन मागण्याचे निवेदन राष्ट्रीय दलित पॅथर संघटनेतर्फे भुसावळ तहसीलदार दिपक धिवरे यांना देण्यात आले आहे.
तसेच मागण्या पुर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *