जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगात ! आज ३१८ बाधित रुग्ण आढळले ;

जळगाव

कोरोनाचा संसर्ग वेगात सुरु असून आज शुक्रवारी ३१८ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. १३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवार व बुधवार असे सलग दोन दिवस तीनशेहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर गुरुवारी त्यात अल्प घट झाली होती. मात्र आज पुन्हा ३०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. आज ३१८ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकुण ६० हजार १८२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार ६८९ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून २ हजार ११० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- १२३, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-२४, अमळनेर-११, चोपडा-३०, पाचोरा-०, भडगाव-५, धरणगाव-१६, यावल-१०, एरंडोल-२, जामनेर-१९, रावेर-१४, पारोळा-११, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-११, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३१८ रूग्ण आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *