भुसावळात 20 हजाराच्या ओल्या गांजासह एकास अटक –


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील गांधी पुतळ्याकडून गांजा येत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षकांना मिळाली असता पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून सापळा रचुन मुद्देमालसह आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की,फिर्यादी पोकॉ जितेंद्र संतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक इसम भुसावळ शहरातील गांधी पुतळ्या गांजा घेऊन येणार असल्याची खात्रीदायक माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळल्यावरून
घटनास्थळी सापळा रचला असता आरोपी राकेश भीमराज नाटकर वय ३० राहणार न्यू सातारा पूल,ओंकारेश्वर मंदिर भुसावळ जवळील असून यांच्या ताब्यातून २ किलो ओला गांजासह मुद्देमाल मिळून आला म्हणून शहर पोलीस स्टेशनला भाग-५ गुरुन ३१/२०२१ भादवि कलम २०,२९(गुंगीकारक औषधी द्रव्य मनुष्य व्यापारावर परिणाम अंमली करणारे पदार्थ अधिनियम १९८५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,पोकॉ. जितेंद्र सोनवणे,संजय बडगुजर,भूषण चौधरी,पोहेकॉ साहिल तडवी अशांनी मिळून केली.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विनोदकुमार गोसावी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *