जळगांव स्थानकावर फोट्रेस टिकिट चेकिंग ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विना तिकिटे प्रवास करणारे /अनियमित तिकीट यात्रा /ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणारे साठी विशेष तिकीट तपासणी मोहीम जळगांव रेल्वे स्टेशन येथे दिनांक 26 रोजी करण्यात आली
भुसावळचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरुण कुमार , सहाय्यक वाणिज्य प्रबंधक(टी जा), मंडल मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलीया आणि विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26.02.2021 ला जळगांव स्टेशन येथे विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिममध्ये एकूण 69 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आल आहे. 14 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 5 आर.पी.एफ कर्मचारी यांनी प्रवाशांकडून एकूण 38410/- रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमध्ये बिना तिकीट प्रवास करणारे 69 केसेस मधून 38410/- रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.या मध्ये दंड भरण्यात असमर्थ होते असे धारा 137नुसार 5 लोकांवर आणि धारा 138 नुसार 1 लोकांवर कारवाई करण्यात आली.
प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *