भुसावळात पालिकेची करवसुलीसाठी धडक मोहिम ; ढोल ताशे वाजवत वसुली सुरु – थकित करधारकांमध्ये घबराट ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

शहरातील नागरिकांकडे नगरपरिषदेची मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदारांना भरणा करण्याच्या सूचना दिल्यानंतरही नागरीक दुर्लक्ष करीत असल्याने आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ पासून भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांंचे मार्गदर्शनाखाली वसूलीकरीता नवीन शक्कल लढवत ढोल- ताशे वाजवून कर वसुली मोहीम सुरू केली आहे. तसेच मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करण्याच्या सूचना देवूनही कर न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी नोटीसीव्दारे दिले आहे.
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी जाहिर केलेल्या नोटीसी प्रमाणे दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पासून थकबाकीदारांची नावे फेसबुक/व्हॉसअँप/ सोशल मीडिया गृपवर व्हायरल करण्यात येत असून शहराच्या मुख्य चौकात मोठ- मोठ्या बॅनर्स वर छापून प्रसिध्दी करण्यात येणाऱ आहे .
थकबाकीदारांच्या घरापुढे ढोल- ताशे वाजवून त्यांना जागे करण्याचे काम सुरु मालमत्तेचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल. नळ कनेक्शन खंडीत करून व वाजंत्री लावूनही १५ दिवसाचे आत त्यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा न केल्यास त्यांची मालमत्तेची / मालमत्तेचा सामानाची कायदेशीर जप्ती करून अधिपत्र फी व दंड आकारून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली करण्यात येईल.
नागरिकांनी सदर कटू प्रसंग टाळण्यासाठी त्वरित मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करून भुसावळ नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी भुसावळ शहरातील नागरिकांना जाहीर
नोटीस फलक लावून केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *