भुसावळात मध्यप्रदेशातील महिलेवर अत्याचार –


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील 35 वर्षीय पीडीतेचे भुसावळातील महिलेशी नाजूक प्रकरणात वाद झाल्यानंतर पीडीता व ती महिला या दोघांनी सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांची समजुत काढल्यानंतर 35 वर्षीय पीडीत महिला गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर 25 ते 30 वयोगटातील संशयीत आरोपीने महिलेला दुचाकीवर बसवून महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरवरील निर्जनस्थळी नेत मारहाण करीत तब्बल दोन वेळा अत्याचार केला.अत्याचारानंतर आरोपीने पीडीतेला ठार मारण्याचा प्रयत्न केला असून आरोपीचा सीसीटीव्हीच्या आधारे कसून शोध घेतला जात आहे.
या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक, शहरेच निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठ सहा.निरीक्षक अनिल मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *