मुक्ताईनगर –

नातेवाईकांकडे लग्नाला आलेल्या 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उचंदा येथे सोमवारी दुपारी घडली होती. या घटनेतील संशयीताला जळगावातून अटक करण्यात आली. चेतन रवींद्र सुतार (20, रा.उचंदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नेपानगर (मध्य प्रदेश) येथील पीडित युवती काकांच्या लग्नासाठी गेल्या तीन दिवसांपासून उचंदा येथे आई-वडिलांसह आली असता पीडीत युवती नातेवाईकांच्या घराशेजारीच पीठाच्या गिरणीमध्ये राहिलेली तिची चप्पल घेण्यासाठी गेली होती. तेथे चेतन रवींद्र सुतार (20, रा.उचंदा) याने अत्याचार केला व नंतर आरोपी पसार झाला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीत चेतन हा सोमवारी एका ट्रकमधून जळगावला उतरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.ं


