भुसावळ (प्रतिनिधी )-

शहरातील दीनदयाळ नगरात बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून वारांगणासह आंबटशौकीन ग्राहकांना अटक केली होती. या प्रकरणी पीटाअन्वये 15 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयीत आरोपी चांद शेख हमीद शेख (30, रा.दीनदयाळ नगर, भुसावळ) हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. 23 रोजी त्यास नाकाबंदीदरम्यान अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, एएसआय माणिक सपकाळे, हवालदार जयेंद्र पगारे, नाईक रवींद्र बिर्हाडे, समाधान पाटील, रमण सुरळकर, चंद्रकांत बोदडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, कृष्णा देशमुख, योगेश माळी, जीवन कापडे, परेश बिर्हाडे आदींनी केली.


