जिजाऊंचे संस्कार मिळाल्यास घराघरात शिवाजी महाराज निर्माण होतील – जिल्हाध्यक्ष नाना पाटील ; छत्रपती महिला शासन मंडळातर्फे शिवजयंती साजरी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील छत्रपती महिला शासन मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी येथील लहान तरुणींनी, मुलींनी एकत्र येत शास्त्रोक्त पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना शिवाजी महाराजांच्या ब्रांझ च्या छोट्या पुतळ्याचे अभिषेक व औक्षण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्ष कु.गायत्री पाटील या मुलीने शिव वंदना म्हटली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी मार्गदर्शन करताना आजच्या काळात जिजाऊ होने फार गरजेचे आहे, संस्कार जर योग्य वेळी योग्य वयात मिळाले तरच जिजाऊ घडतील पर्यायाने घराघरात शिवाजी महाराज निर्माण होतील आज ह्या मुलींनी सुरू केलेला उपक्रम अत्यंत उल्लेखनीय कौतुकास्पद आहे नुसते ढोल ताशे ची मिरवणूक काढून नाही तर योग्य संस्कारशील उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे तो उपक्रम यां मुलींनी, तरूणींनी हाती घेतला आणि परिसरातील मुलींना एकत्र करत येत शिवाजी महाराज जयंती साजरी केली हे करताना एकमेकांच्या घराशी स्नेहपूर्वक संपर्क करून एकोपा निर्माण करण्याचाही यानिमित्ताने चांगला प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी केले यावेळी कार्यक्रमाला राज्य सल्लागार रघुनाथ आप्पा सोनवणे उपस्थित होते यांनी लहान मुलींचा कार्यक्रम पाहून ते खूप गहिवरले या लहान वयात मुलींनी केलेले कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद बाब आहे , कार्यक्रमाचे नियोजन बाबत ही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले यावेळी त्यांनी त्या सर्व मुलींचे कौतुन म्हणून मंडळाला बक्षीसही दिले . छत्रपती शिवाजी महिला शासन मंडळ ची अध्यक्ष कु.गायत्री पाटील ,उपाध्यक्ष कु. राजश्री ओगले ,सचिव कु. श्रेया पाटील ‌, पूजा चव्हाण, दीक्षा मराठे, आश्लेषा चव्हाण , आरती बाक्ष्ये, रीया पाटील ,कांचन लोहार , सेजल खडसे यांनी या कार्यक्रमांचे खूप छान आयोजन केले सक्रिय सहभाग घेवून छान कार्यक्रम घडवून आणला . परिसरातील महिला ,युवती, बंधू-भगिनी उपस्थित होते यावेळी डॉक्टर सौ .अनिता मगर तसेच कुमारी रिया पाटील तिनेही छत्रपती शिवाजी महाराज बद्दल अतिशय छान विचार व्यक्त केले या यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले यानंतर शिवजयंतीच्या निमित्ताने परिसरातील खुल्या मैदानात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले यामध्ये विविध स्वरूपाची पर्यावरणाला पूरक असलेली झाडे वड ,पिंपळ, निंब ,कांचन, चिंच अशा विविध स्वरूपाची वृक्ष लावण्यात आली त्या वृक्षाचे संगोपनाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महिला शासन या मुलींच्या मंडळाने स्वीकारली या कार्यक्रमांना परिसरातील अनेक माता-भगिनी उपस्थित राहून लहान मुलांनी केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले यावेळी विशेष सहकार्य श्रीमती अर्चना पाटील, डॉ. अनिता मगर ,कु आकाश मगर, मंगला बोरसे, सोनू बोंडे, कांचन लोहर, आदित्य मगर, पिंटू पाटील, भरत जयस्वाल, प्रशांत कुलकर्णी, प्रशांत चौधरी, दत्तु लोहार या सर्वांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *