भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीची चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांच्या राष्ट्रवादीची गटाची सरशी झाली तर आमदार संजय सावकारे यांच्या भाजपच्या गटाचा या निवडणुकीत पराभव झाला. भाजप गटातर्फे सरपंच पदासाठी दीपक तायडे व उपसरपंच पदासाठी सोनल झोपे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून सरपंच पदासाठी सुवर्णा कोळी व उपसरपंच पदासाठी निर्मला घोडेस्वार रींगणात होते. दोन्ही गटांच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले मात्र सरपंच पदासाठी भाजपचे उमेदवार दीपक तायडे यांच्या अर्जावर जातीच्या दाखल्या संदर्भात तर राष्ट्रवादीच्या सुवर्णा कोळी यांच्या जातवैधतेच्या संदर्भात हरकती घेतल्या गेल्या. यावर निवडणूक निर्णय अधिकारी सतीश इंगळे यांनी निर्णय देऊन गुप्त मतदान घेतले. तब्बल तीन तास प्रक्रिया चालली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच पदाचे उमेदवार सुवर्णा कोळी व उपसरपंच उमेदवार निर्मला घोडेस्वार यांना प्रत्येकी नऊ मते मिळाल्याने त्यांच सरपंच व उपसरपंच पदावर वर्णी लागली.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, नगरसेवक उल्हास पगारे आदींनी स्वागत केले. यावेळी संतोष निसाळकर,विशाल खेडकर, राहु घोडेस्वार, कल्पना विनायक वासनिक, आशाबाई निंबाजी हुसडे, पल्लवी विक्रांत वाघमारे, पुष्पाबाई नथ्थु जैन, कल्पनाबाई अजय मोरे, सुरेश यशोदे, विनायक वासनिक, अॅड.धनराज मगर, प्रकाश मोरे, आनंद घोडेस्वार, दिलीप मोरे, विशाल सोयंके, गफ्फार खान, कुणाल खेडकर, जगन बागुल, जाँटी धीवरे आदी मंडळी उपस्थित होते.



