वसंत पंचमीनिमित्त श्री बडा हनुमान मंदिरात बालिकांद्वारा सरस्वती पूजन –

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वॉर्डातील श्री बडा हनुमान मंदिरात मंगळवार, 16 फेब्रुवारी म्हणजे वसंत पंचमीनिमित्त विदयेचि देवी सरस्वतीचे पूजन बालिकां द्वारे करण्यात आले. सरस्वतीच्या मूर्तीला माल्यार्पपण पूजन करून आरती करण्यात आली. नंतर माणसी, दर्शिका, खुशी, मिताली, नंदिनी या बालिकांनी सरस्वती वंदना केली. उपस्थिताना वसंत पंचमीबद्दलची माहिती भारती वैष्णव यांनी दिली.
यशस्वीतेसाठी श्री बडा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत रामदासजी वैष्णव, बजरंग भजनी मंडळ अध्यक्ष रविंद्र पुरोहित, रवी मेघा वैष्णव, विमल वैष्णव, संतोष टाक, गोविंद अग्रवाल यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *