भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयातून जागेच्या अभावी रद्दबातल झालेल्या विविध विषयांची दुर्मिळ पुस्तके दि.२२/०२/२०२१ ते २७/०२/२०२१ सकाळी १० ते २ वाजेच्या दरम्यान महाविद्यायाच्या वाचक कक्षामध्ये अल्पशा दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तरी शहरातील वाचकप्रेमी,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. मीनाक्षी व्ही.वायकोळे,उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील,उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे,उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी,उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे उपग्रंथपाल आशिष व्ही.चौधरी यांनी केले आहे.



