भुसावळात भंगार व्यावसायीकांच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
शहरातील दुचाकींच्या होत असलेल्या चोर्‍यांच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून शहरातील 13 भंगार व्यावसायीकांची गोदामे अचानक तपासण्यात आली. यात काही संशयास्पद मोटर सायकली, रीक्षा, कार आदी मिळून आली. यामुळे पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून न्यायालयाकडून संबंधित भंगार व्यावसायीकांची चौकशी करण्याची परवानगी मिळविली आहे. त्यामुळे 11 व्यावसायीकांची आता पोलिसांकडून चौकशी केली जाईल.
मंगळवारी सकाळी 11.30 वाजता सहायक पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील विविध भागातील भंगार गोदामावर एकाच वेळी जात त्या गोदामांची अचानक तपासणी केली, यात पोलिसांना चार चाकी वाहने तीन, तीन चाकी रिक्षा दोन, दुचाकी वाहने 20, दुचाकी वाहनांचे इंजीने दोन, इलेक्ट्रीकल मोटर बॉडी 45, मोटर सायकलचे स्पेअर पार्ट 16, व्हील डीस्क 4, पाईप 8, अ‍ॅगल 2, लोखंडी नवे तार बंडल 2, जनरेटर 3, संगणक सीपीयु 1 असा मुद्देमाल मिळून आला. हा माल कोणाकडून घेतला. त्याची काही सौदे पावती आहे का, याची चौकशी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. त्याच साठी आता पोलिसांनी न्यायालाकडून चौकशीसाठी परवानगी घेतली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दितील दोन भंगार व्यावसायीकांची चौकशी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील तर बाजारपेठच्या हद्दीतील 11 जणांची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *