भुसावळ (प्रतिनिधी )-
सक्षम कौन्सिलींग सेंटर व भुसावळ आर्ट्स सायन्स व पी. ओ.नाहटा काॅमर्स काॅलेज भुसावळ यांच्या मधे कौन्सिलींग साठी एम.ओ. यू. ( मेमोरंडम आॅफ अंडरस्टॅडींग) साईन करण्यात आला आहे .
आज काल मुलांना ज्या विविध पातळ्यांवर टेन्शन ला सामोरे जावे लागते, व त्याचा परिणाम त्यांच्या भावी जीवनावर होत असतो, यासाठी कौन्सिलींगच्या मदतीने विद्यार्थ्यांना, पालकांना, विशेषतः “आईं” ला, यामुळे यासर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी हा काॅलेजच्या प्रिन्सिपल डाॅ. मिनाक्षी वायकोळे यांनी सक्षम कौन्सिलींग सेंटरच्या मदतीने हे करण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे . या बद्दल सर्वत्र काॅलेज मॅनेजमेंट व प्रिन्सिपल यांचे कौतुक होत आहे. सक्षम कौन्सिलींग सेंटरच्या सौ. आरती सारंग चौधरी यांनी सांगितले की याचा मुलामुलींसाठी नक्कीच फायदा होईल. शारीरिक आरोग्या इतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते पण नेमके त्याच कडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे परिणाम ना की फक्त विद्यार्थ्यांना पण पर्यायाने समाजालाच भोगावे लागतात.
तसेच “इमोशनल इंटेलिजन्स” चा वापर कसा करायचा, ब-याच मुलांना आयुष्यात, भविष्यात काय करायचे तेच समजत नाही. त्यांना योग्य ते मार्गदर्शन या मार्फत करता येईल व एक निकोप समृद्ध पिढी या मार्फत आपण घडवू अशा शब्दांत त्यांनी मनोगत कळविले तसेच ब-याच मुलांना किंवा आईवडीलांना समजत असते की कौन्सिलींगची गरज आहे पण कौन्सिलींग साठी कसे कोठे जायचे हा प्रश्नच असतो त्यांना या मार्फत मार्गदर्शन करता येईल. कौन्सिलींग ही एक सपोर्ट सिस्टीम आहे. आणि यामधे गुप्तता ही आवश्यक आहे व ती नक्कीच पाळली जाईल असे आरतीॅ चौधरी यांनी सांगितले . sksham counselling.org यावर अधिक माहिती आहे .



