मध्य रेल्वे सांगोला-आदर्श नगर नवी दिल्ली दरम्यान द्वि-साप्ताहिक किसान रेल चालविणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
 प्रचंड मागणीमुळे, मध्य रेल्वेने दिनांक ६.२.२०२१  पासून सांगोला ते आदर्श नगर, नवी दिल्ली आणि आदर्श नगर, नवी दिल्ली ते दौंड दरम्यान द्वि-साप्ताहिक किसान रेल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे :
ट्रेन क्रमांक ००१०१ किसान रेल प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी दिनांक ६.२.२०२१ ते २७.२.२०२१ दरम्यान सांगोला येथून  १६.५० वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी ०१.३० वाजता आदर्श नगर, नवी दिल्ली येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ००१०२ किसान रेल प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी दिनांक ८.2.२०२१ ते १.३.२०२१ दरम्यान  आदर्श नगर, नवी दिल्ली येथून ११.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १६.०० वाजता दौंड येथे पोहोचेल.
थांबे – कुर्डुवाडी, दौंड, मनमाड, भुसावळ, इटारसी, झांसी आणि हजरत निजामुद्दीन

 -संरचना सांगोला येथून तीन पार्सल व्हॅन व कुर्डुवाडी येथून एक सामानसह गार्ड ब्रेक व्हॅन , तीन पार्सल व्हॅन आणि १८ पार्सल व्हॅन भुसावळ येथून.

 पार्सल लोडर्स आणि ई-कॉमर्स कंपन्या ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या आहेत त्यांनी ह्याची नोंद घ्यावी व संधीचा फायदा घ्यावा.
तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अथवा पार्सल ऑफिसशी संपर्क साधा.
या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रवाशांना प्रवेश देण्याची वा चढण्याची मुभा दिली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *