भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील अवधूत मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारे गणेशोत्सवातील धार्मिकता वाढीस लागावी यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. गणेश उत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धा व गणपती अथर्वशीर्ष सामूहिक पठण श्री गजानन महाराज मंदिर दत्तनगर येथे संपन्न झाले. नंतर उत्तम भजन संध्या पार पडली. संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर जोशी ,उपाध्यक्ष श्री रमाकांत घोडके, सचिव श्री चंद्रकांत सोनवणे. यांच्या शुभहस्ते गणेश पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, शहरातील सर्वांचे कल्याण व्हावे व गणेशाची कृपा सर्वांवर असावी या हेतूने संस्थेद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात आला असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमासाठी गजानन महाराज मंदिर चे अध्यक्ष श्री मधुकर ढाके उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील सर्व महिला वर्गाचा उत्तम सहभाग लाभला. अवधूत फाउंडेशन द्वारे असे विविध प्रकारचे धार्मिक व लोक उपयोगी कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असतात असे प्रतिपादन करून शेवटी स्वप्नाली घोडके यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली .


