बियाणी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये जन्माष्टमी जल्लोषात साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील बियाणी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा सोहळा शाळेतल्या बाल गोविंदानी अतिशय उत्साहात साजरा केला. राधा कृष्णाच्या वेशभुषेत शाळेत विद्यार्थी व विद्यार्थीनी आले होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते बाळकृष्णाची आरती करण्यात आली. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी,स्मिता बियाणी,मिलिटरी स्कूलचे प्रिन्सिपल डी.एम.पाटील,शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया आदी मान्यवर उपस्थित होते.कृष्ण आणि राधाच्या वेशातील वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात दहीहंडी फोडली. कृष्ण भगवानांच्या लीलांचे वर्णन,कालिया मर्दन, ब्रम्हांड दर्शन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळेच्या शिक्षिका फातीमा यांनी सुत्र संचलन केले तर मुख्याध्यापक   रुद्रसेन गंठीया यांनी आभार मानले.

फोटो कॅप्शन - भुसावळातील बियाणी स्कुल व ज्युनियर कॉलेज मध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी फोडताना विद्यार्थी.