नवी मुंबई:(शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६ ) सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावरील प्रवाशांकरिता दि. ३ जून २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सुरू करण्यात आले असून त्यापूर्वी वापरात असलेली क्लोज्ड लूप कार्ड बंद करण्यात आली आहेत. क्लोज्ड लूप कार्डवरील शिल्लक रकमेचा परतावा दि. १५ सप्टेंबर २०२६ या अंतिम मुदतीपर्यंत प्राप्त करण्याचे आवाहन सिडकोतर्फे मेट्रो प्रवाशांना करण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वर यापूर्वी शुल्क भरणा करण्याकरिता क्लोज्ड लूप कार्ड वापरात होते. सदर क्लोज्ड लूप कार्ड दि. ३ जून २०२६ पासून बंद करण्यात आली असून सदर जुनी क्लोज्ड लूप कार्ड या मार्गावरील कोणत्याही मेट्रो स्थानकावर प्रवासासाठी वैध राहिलेली नाहीत. ज्या प्रवाशांकडे अद्याप शिल्लक रक्कम असलेली क्लोज्ड लूप कार्ड आहेत अशा प्रवाशांनी निर्धारित मुदतीत आपल्या कार्डवरील शिल्लक रकमेचा परतावा प्राप्त करून घ्यावा. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी निर्धारित मुदतीत प्रवाशांनी परताव्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.


