गुरूमाऊलींच्या सान्निध्यात भुसावळात जैन बंधू-भगिनींनी साजरा केला राखी उत्सव


भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील सुराणा साधना भवन येथे प. पू. जैन गुरूमाऊली सम्यक् दर्शनाजी म. सा. आदी ठाणे तीन यांच्या पवित्र सान्निध्यात राखी पौर्णिमेनिमित्त जैन बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहात राखी उत्सव साजरा केला. यावेळी भाविकांनी एकमेकांना राख्या बांधून बंधुभाव, प्रेम आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला.

सुराणा साधना भवन येथे दररोज सकाळी ८.४५ ते १०.५५ या वेळेत प. पू. जैन गुरूमाऊली सम्यक् दर्शनाजी म. सा. आदी ठाणे तीन यांचे प्रेरणादायी प्रवचन मोठ्या उत्साहात सुरू आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दि. २८ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात जैन समाजातील बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी सर्व भाविकांनी जप-तप, भक्तिगीते आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला. गुरूमाऊलींनी आपल्या प्रवचनातून राखी पौर्णिमेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व विशद करत उपस्थित भाविकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या उत्सवात सुमारे २०० ते ३०० भाविक भक्तजन सहभागी झाले होते. कार्यक्रमात संघपती जयंतीलाल सुराणा, जे. बी. कोटेचा, अशोक सुराणा, धरमचंद चोपडा, सुरेशचंद्र देवडा, कांतिलाल चोरडिया, गौतम चोरडिया, अतुल ताथेड, अशोक डोसी, राजेश बाफना, विनोद मेहता, राजेश मेहता, राजेश छाजेड, महेंद्र सुराणा, विशाल चोरडिया, उत्तमचंद कोटेचा, सुरेशचंद्र कुमट, दिनेश संचेती, विनोद डोसी, बन्सीलाल चिप्पड, आर. बी. चोपडा यांच्यासह मोठ्या संख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

धार्मिक वातावरण, भक्तिमय जप-तप आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा झालेला हा राखी उत्सव जैन समाजासाठी विशेष आनंदाचा आणि संस्मरणीय ठरला.

फोटो कॅप्शन : भुसावळातील सुराणा साधना भवन येथे एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करताना जैन बंधू-भगिनी.