कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ ( प्रतिनिधी )- अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघ प्रणित बहिणाबाई ब्रिगेडच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती निसर्ग प्लाझा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमात बहिणाबाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सौ. स्वाती भोळे व शहराध्यक्ष मनीषा पाटील यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, प्रदेश संघटक रुपेश दादा चौधरी, सोशल मीडिया प्रमुख शुभम पाटील तसेच प्रशांत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यविश्वाला दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात बहिणाबाई ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.