उज्जैनच्या महाकालेश्वरातून आणलेल्या कावडीने कंडारीतील कपिलेश्वर महादेवाला जलाभिषेक

भुसावळ (प्रतिनिधी )- द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरापासून तब्बल ३५० किलोमीटरहून अधिक खडतर प्रवास करून कावड आणण्यात आली. या कावडीतील पवित्र जलाने भुसावळमधील कंडारी येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.

या धार्मिक उपक्रमानिमित्त भुसावळ येथील गौरक्षकांच्या वतीने कावड घेऊन आलेल्या सर्व भाविकांसाठी श्री हिरा मारुती मंदिर येथे मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. भुसावळ नगरपरिषदेच्य लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांच्या हस्ते मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.

गौसेवक व गौरक्षक  रोहित महाले (मानद पशुकल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी गौरक्षक . वैभव वाघे, . आदित्य धायडे (बल्लू भाऊ), . वैभव नेहते,  भावेश नेमाडे तसेच रुपेश पाटील यांचा सहभाग होता.

यावेळी उपस्थित भाविकांना “संपूर्ण जगात एका आईचे आणि दुसरी आपली गौमाता—गायीचे दूध हे अमृतासमान आहे. दुधापेक्षा अधिक पौष्टिक दुसरे काहीच नाही,” असा संदेश देण्यात आला. धार्मिक श्रद्धेसोबतच गौसेवा आणि गोमातेच्या महत्त्वाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.