दीपनगर, (१५ ऑगस्ट २०२६ ) - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सणानिमित्त केंद्रातील कामगार, पदाधिकारी, विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगरचे अधीक्षक अभियंता मा. श्री. संतोष चंद्रमणी होते. त्यांच्या हस्ते सकाळी ८.१० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शारदा शिक्षण मंडळ, दीपनगरचे संचालक मा. श्री. स्वप्नील पाटील उपस्थित होते. विशेष उपस्थितीत कामगार वीज महासंघाचे उपमहामंत्री मा. श्री. अनंत जाधव, मनोज मोरे, संजय अमोदकर, श्रीराम फड, सचिन भावसार, छगन पवार यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दीपनगरचे शैलेंद्र सपकाळे, शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयाचे महेंद्र सपकाळे सर व निलेश नेहेते सर, तसेच अभिषेक पाटील, मिलिंद पाटील, अजय साळुंखे, वर्षा तायडे, विद्या कोळी आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिवण वर्गातील विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कामगार कल्याण केंद्र, दीपनगरचे केंद्र संचालक किशोरकुमार मनोहर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. ललित माळी व सौ. शारदा भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून स्वातंत्र्य दिनाचा देशभक्तीचा संदेश देत कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे १५ ऑगस्टचा राष्ट्रीय उत्सव उत्साहात संपन्न झाला.


