ॲड. कैलास शेळके यांची जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी फेरनिवड


भुसावळ (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या पूर्व जिल्हाध्यक्षपदी ॲड. कैलास शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष . गौतमजी पाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी दिले.

ॲड. कैलास शेळके यांच्या फेरनिवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाला जिल्ह्यात अधिक बळकटी मिळणार असून, संघटनात्मक कार्याला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या नियुक्तीचे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे पूर्व जिल्हाध्यक्ष ॲड. धनंजय चौधरी, दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष बंटीभैया पाटील, प्रदेश सचिव ॲड. प्रवीण सुरवाडे, प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष मुंनवर खान, नगरसेवक अहमद कुरेशी, माजी जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, इस्माईल गवळी, भिकाजी अहिरे आदींनी स्वागत करून ॲड. कैलास शेळके यांचे अभिनंदन केले.

शेळके यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.