नाहाटा महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची २६ वी सभा उत्साहात संपन्न : अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपाध्यक्षपदी सौ. आशा कैलास पाटील यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी) - भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी पालक-शिक्षक संघाची २६ वी सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपाध्यक्षपदी सौ. आशा कैलास पाटील, तर सचिवपदी प्रा. डॉ. कुंदा मुरलीधर चौधरी यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमात इयत्ता ११ वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करून गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन श्री. महेश फालक, सचिव श्री. विष्णू भाऊ चौधरी व कोषाध्यक्ष संजय कुमारजी नाहाटा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य वाय. एम. पाटील यांनी केले. विद्यार्थिनी गुंजन अत्तरदे हिने मनोगत व्यक्त केले. तसेच माजी उपाध्यक्ष सौ. रजनीताई सावकारे आणि हिशोब तपासणीस श्री. मुकेश अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्ना फेगडे यांनी केले, तर आभार प्रा. एच. बी. राजपूत यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील, समिती सदस्य प्रा. जे. ए. चौधरी, प्रा. एस. एम. फेगडे, प्रा. एस. एम. सोनवणे, प्रा. एच. बी. राजपूत, प्रा. जे. टी. बेंडाळे, प्रा. एम. एल. गोसावी, प्रा. एन. एस. गवळी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.