भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी मंडल रेल प्रबंधक कार्यालय, भुसावळच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. मंडल रेल प्रबंधक श्री. पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते सकाळी ९.२० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ९.०६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाची तुकडी निर्धारित ठिकाणी उभी राहणार असून, परेड कमांडर द्वितीय प्रभारी निरीक्षकांकडून कमान स्वीकारतील. सकाळी ९.१० वाजता वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) यांचे आगमन होईल. त्यानंतर मंडल रेल प्रबंधक श्री. पुनीत अग्रवाल यांचे आगमन होऊन राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ चे गायन करण्यात येईल. सकाळी ९.२० वाजता मंडल रेल प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर सकाळी ९.२२ वाजता राष्ट्रगानाचे गायन करण्यात येणार आहे. सकाळी ९.२३ वाजता मंडल रेल प्रबंधक यांच्याकडून महाव्यवस्थापकांचा संदेश वाचून दाखविण्यात येईल. सकाळी ९.३३ वाजता परेड विसर्जन होईल. त्यानंतर सकाळी ९.३५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सकाळी ९.४० वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार असून, सकाळी १० वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल. या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी दिलीप रं. खरात, मध्य रेल्वे, भुसावळ यांनी केले आहे.


