भुसावळात जागतिक आदिवासी दिन उत्साहात : महिलांचा सक्रिय सहभाग ठरला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ; आदिवासी क्रांतिकारक समशेरसिंग पारधी समाज बहुउद्देशीय संस्था व आदिवासी पारधी समाजाचा संयुक्त उपक्रम.

 भुसावळ (प्रतिनिधी ) : जागतिक

आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारक समशेरसिंग पारधी समाज बहुउद्देशीय संस्था, भुसावळ आणि आदिवासी पारधी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाबाबत यावेळी विचारमंथन करण्यात आले. समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या परंपरा, संस्कृती आणि हक्कांचे जतन करण्याबरोबरच पुढील पिढीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.