देवळाली–दानापूर ‘शेतकरी समृद्धी’ अनारक्षित विशेष रेल्वेची मुदतवाढ; 10 ऑगस्टपर्यंत सेवा सुरू

भुसावळ, प्रतिनिधी : शेतकरी व प्रवाशांची सोय तसेच वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने देवळाली–दानापूर दरम्यान धावणाऱ्या 'शेतकरी समृद्धी' अनारक्षित विशेष रेल्वे सेवेची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार, गाडी क्रमांक 01053 देवळाली–दानापूर अनारक्षित विशेष रेल्वे ही 18 जुलै 2026 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01054 दानापूर–मनमाड अनारक्षित विशेष रेल्वे ही 20 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत विस्तारित करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, या विशेष रेल्वेच्या वेळापत्रक, थांबे आणि रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रवाशांनी अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.