खानदेशभूषण वारकरी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान :

       सावदा/प्रतिनिधी :- पंढरपूर आषाढी वारी
खानदेश भूषण वारकरी ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांची वारी पंढरपूरकडे गादीपती ह.भ.प धनराज महाराज यांच्या नेतृत्वात व विणेकरी ह.भ.प चिंतामण महाराज यांचे निगराणीमध्ये प्रस्थान केले. ह.भ.प जितू महाराज, ह.भ.प शालिग्राम महाराज,सुभाष महाराज,दिनेश महाराज,भुरा महाराज,संजय महाराज यांची उपस्थिती या वारी मध्ये आहे.तसेच सावदा येथून राजेंद्र श्रीकांत चौधरी माजी नगरअध्यक्ष ,डॉ. संजय भंगाळे,एकलव्य कोल्हे, राजेंद्र भंगाळे,सागर प्रमोद चौधरी,माधुरी भंगाळे,प्रतिभा महाजन बऱ्हाणपूर यांचेसह 500 लोकांची उपस्थिती आहे.रामकृष्ण हरी च्या गजरात वारी निघाली आहे.