भुसावळ(प्रतिनिधी ) भुसावळ विभागात दि. 17.06.2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली 31.03.2026 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी विभागीय राजभाषा अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस विभागातील विविध विभागांचे शाखा अधिकारी तसेच उपसमिती अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले स्टेशन व्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अपर मुख्य राजभाषा अधिकारी तथा अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री एम. के. मीणा यांनी अध्यक्ष महोदयांचे शुभचिन्ह म्हणून रोप देऊन स्वागत केले. त्यानंतर संपर्क राजभाषा अधिकारी तथा विभागीय यांत्रिक अभियंता श्री युनूस अन्सार मकानू यांनी अपर मुख्य राजभाषा अधिकारी तथा अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) यांचे शुभचिन्ह म्हणून रोप देऊन स्वागत केले तसेच उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत व अभिनंदन केले. बैठकीत संबंधित तिमाहीदरम्यान राजभाषा हिंदीच्या वापर व प्रसाराची स्थिती, कार्यालयांमधील हिंदीतील मूळ पत्रव्यवहार, टिपण लेखन, मसुदा तयार करणे, हिंदी प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन तसेच राजभाषेशी संबंधित विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. अध्यक्ष महोदयांनी राजभाषा हिंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर करण्याबरोबरच प्रादेशिक भाषा मराठीचाही समन्वय साधण्यावर भर दिला. तसेच निर्धारित राजभाषा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या. बैठकीच्या शेवटी संपर्क राजभाषा अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व अधिकारी व सदस्यांचे आभार मानले.




