भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्वे विभागात नव्याने नियुक्त झालेले एडीआरएम प्रवीण कुमार पाठक यांचा रेल कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या नव्या एडीआरएम यांच्यासमोर मांडल्या.

कार्यक्रमादरम्यान मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची विनंती त्यांनी प्रवीण पाठक यांच्याकडे केली. यावर एडीआरएम पाठक यांनी समस्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, प्रीतम टाक, योगेश माळी, विनोद वाघे, मुकेश महाजन, तेजल पाटील, शांताराम सपकाळे, रमेश मराठे, पी. एन. करसाळे, पी. व्ही. ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : नूतन एडीआरएम प्रवीण कुमार पाठक यांचा सत्कार करताना मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांच्यासह प्रीतम टाक, विनोद वाघे, योगेश माळी, पी. एन. करसाळे आदी.


