बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई( लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस गाडीचे शुभारंभ

भुसावळ (प्रतिनिधी) – माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी २८.०४.२०२६ रोजी बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई( लोकमान्य टिळक टर्मिनस)‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाडीला हिरवा झेंडा दाखविला.
भारतीय रेल्वेने आपल्या प्रादेशिक वाहतूक सेवेचा विस्तार करत, महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे उत्तरप्रदेशशी जोडणाऱ्या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. दररोज धावणारी बनारस-हडपसर (पुणे) आणि आठवड्यातून एकदा धावणारी अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस)यांचा यात समावेश आहे.
दिनांक २९.०४.२०२६ रोजी भुसावळ विभागात या उदघाटन विशेष सेवेच्या कार्यक्रमात –
खंडवा स्थानकावर बनारस-पुणे अमृत भारत एक्सप्रेस करिता (हडपसर) माननीय श्री कुंवर विजय शाह, मंत्री (मंत्रिमंडळ) आदिम जाति कार्य विभाग, मध्य प्रदेश शासन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गाडी रवाना करण्यात आली. या प्रसंगी श्रीमती छाया मोरे, आमदार पंधाना, श्री नारायण पटेल, आमदार मांधाता तसेच श्रीमती अमृता अमर यादव, महापौर खंडवा यांच्यासह इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
भुसावळ स्थानकावर श्रीमती रक्षा निखिल खडसे माननीय केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल, आणि इतर शाखा अधिकारी उपस्थित होते.
जळगाव स्थानकावर श्रीमती स्मिता उदय वाघ (माननीय खासदार, जळगाव), जिलाधिकारी श्री रोहन घुगे, पुलिस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे एवं मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला परिषद श्रीमती करिश्मा नायर, अपर विभागीय रेलवे व्यवस्थापक (प्रशासन) श्री प्रवीण कुमार पाठक आणि इतर रेलवे अधिकारी उपस्थित होते.
मनमाड स्थानकावर बनारस-पुणे एक्सप्रेस करिता श्री भास्कर भगरे (माननीय खासदार दिंडोरी) उपस्थित होते.
नाशिक रोड स्थानकावर अयोध्या-मुंबई( लोकमान्य टिळक टर्मिनस) करिता श्रीमती देवयानी एस. फरांदे (मा. आमदार, नाशिक पश्चिम) आणि इतर रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती, विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य, पत्रकार व मिडिया प्रतिनिधी, तसेच स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्थानिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय व उत्साहवर्धक झाले.
ही नवी सेवा भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी प्रवास सुलभता आणि संपर्क यामध्ये लक्षणीय वाढ करणार असून खंडवा, भुसावळ, जळगांव, मनमाड आणि नाशिक रोड यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
बनारस-हडपसर(पुणे) गाडी मुळे, काशी विश्वनाथ धाम ला जाण्याची सोय होऊ शकेल. तर अयोध्या-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी, श्री राम मंदिर तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. या गाड्यांमुळे महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणे शक्य होईल. विशेषतः दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित मंजूर आणि महाराष्ट्र व उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना या गाड्यांचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. थेट संपर्कामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि गाड्या बदलण्याची गरजही उरणार नाही.
नवीन सुरू झालेली ही सेवा भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या गाड्या खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि नाशिक रोड या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत. बनारस–हडपसर (पुणे) ही गाडी दररोज धावणार असून अयोध्या–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे.
मध्यप्रदेशमार्गे धावणाऱ्या या गाड्यांमुळे प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि थेट होणार आहे. तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि महाराष्ट्र–उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. थेट रेल्वे संपर्कामुळे वेळेची बचत होणार असून गाड्या बदलण्याची गरजही कमी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.



