भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र दिनानिमित्त अनिक फाउंडेशन, उत्कर्ष कलाविष्कार आणि कविश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे राेजी रात्री ८.३० वाजता मुशायरा आयाेजित केला आहे. खडका चाैफुली येथे ‘एक शाम मिर्झा अफसर बाधगवी के नाम’ हा काव्यसाेहळा रंगणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील नामवंत शायर त्यात आपल्या रचना सादर करतील.
कार्यक्रमाला वस्त्राेद्याेग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थान अब्दुल रऊफ आणि अब्दुल मजीद झकेरीया भूषवतील. सूत्रसंचालन हारुण उस्मानी करणार आहेत. या मुशायऱ्यात शकील हसरत, झुबेर अली ताबीश, जमील असगर, नईम अख्तर खामी, झिया बागपती, एजाज शेख, अक्रम कुरेशी, महेश हाेनमने यांच्यासह नामवंत शायर सहभागी हाेतील.



