भुसावळात भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे ‘जनआक्रोश’ आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी) – लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळात भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जनआक्रोश आंदोलन करत निषेध नोंदवला.

काँग्रेस तसेच विरोधी पक्षांच्या आघाडीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ भाजप महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलनादरम्यान महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

हे आंदोलन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर शांततेत पार पडले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या वेळी उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेविका प्राची पाटील, सोनल महाजन, सोनल इंगळे, सीमा नरवाडे, पूजा तायडे, प्रीती पाटील, आशा पाटील, महिमा नागराणी, अनिता सपकाळे, मेघा वाणी, प्रिया चौधरी, संगीता बियाणी, अनिता आंबेकर यांच्यासह भाजपच्या अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांच्या या आंदोलनातून नारीशक्ती वंदन अधिनियमाला पाठिंबा दर्शवित विरोधकांच्या भूमिकेविरोधात जनआक्रोश व्यक्त करण्यात आला.