भुसावळ (प्रतिनिधी) – कंडारी परिसर, मिलिटरी स्टेशन, आयुध निर्माणी परिसरात जानेवारी २०२५ पासून बिबट्यांचा अधिवास आढळून आला होता. या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत होती. वन विभागाने १० दिवसांपासून या भागात दोन पिंजरे लावले होते. शनिवारी (दि.२५) मध्यरात्री मिलिटरी स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये नर आणि मादी असे दोन बिबटे जेरबंद झाले.

२८ जानेवारी २०२५ रोजी मिलिटरी स्टेशनच्या फिल्टर हाऊसजवळ गस्तीवर असलेल्या जवानाला सर्वांत प्रथम बिबट्याचे दर्शन झाले होते. यानंतर कंडारी तापी खोरे,
आयुध निर्माणी कर्मचारी वसाहत, विद्यालय या परिसरात अनेकदा बिबट वावर दिसला होता. कंडारीचे पोलिस प रामा तायडे यांनी याबाबत अनेकवेळ विभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी होती. मात्र, वन विभागाकडून सातत्याने केले जात होते. यानंतर पुन्हा तक्रारी वा वन विभागाने गेल्या दहा दिवसांपासून कि स्टेशनमध्ये दोन स्वतंत्र पिंजरे लाव दिवसांपासून त्यात बोकड बांधून ठेव होते. तरीही बिबटे चकवा देत होते शनिवारी मध्यरात्रीनंतर दोन्ही पिंज एक नर व एक मादी बिबटे जेरबंद झा सुरक्षित अधिवासात सोडले जाणार असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र


