भुसावळ (प्रतिनिधी) –

उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी रेल्वे बलसाड ते दुर्गापूर, उधना ते दुर्गापूर आणि उधना ते समस्तीपूर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार आहे.
१) बलसाड ते दुर्गापूर विशेष (०२ सेवा)
गाडी क्रमांक 09143 विशेष दिनांक २५.०४.२०२६ रोजी बलसाड येथून १२.५० वाजता सुटेल आणि दुर्गापूर येथे तिसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पोहोचेल (१ सेवा).
गाडी क्रमांक 09144 विशेष दिनांक २७.०४.२०२६ रोजी दुर्गापूर येथून ०७.०० वाजता सुटेल आणि बलसाड येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल (१ सेवा).
थांबे -: भेस्थान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दयाल उपाध्याय, सासाराम, गया, कोडरमा, धनबाद, आसनसोल आणि अंडाल.
संरचना: ४ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामानासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
२) उधना ते दुर्गापूर विशेष (०४ सेवा)
गाडी क्रमांक 09175 विशेष दिनांक २६.०४.२०२६ आणि २७.०४.२०२६ रोजी उधना येथून ०८.३५ वाजता सुटेल आणि दुर्गापूर येथे दुसऱ्या दिवशी २०.५० वाजता पोहोचेल (२ सेवा).
गाडी क्रमांक 09176 विशेष दिनांक २७.०४.२०२६ आणि २८.०४.२०२६ रोजी दुर्गापूर येथून २३.५० वाजता सुटेल आणि उधना येथे तिसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल (२ सेवा).
थांबे -: नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दयाल उपाध्याय, सासाराम, गया, कोडरमा, धनबाद, आसनसोल आणि अंडाल.
संरचना: ०५ शयनयान, १० सामान्य द्वितीय, १ सामानासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
३) उधना – समस्तीपूर अनारक्षित विशेष (१२ सेवा)
गाडी क्रमांक 09069 विशेष दिनांक २४, २५, २७, २८, २९ आणि ३०.०४.२०२६ या कालावधीत उधना येथून ०५.३० वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वाजता पोहोचेल (०६ सेवा)
गाडी क्रमांक 09070 विशेष दिनांक २५, २६, २८, २९, ३०.०४.२०२६ आणि ०१.०५.२०२६ या कालावधीत समस्तीपूर येथून १९.०० वाजता सुटेल आणि उधना येथे तिसऱ्या दिवशी ०४.४५ वाजता पोहोचेल (०६ सेवा)
थांबे -: चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदनमहाल, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि मुजफ्फरपुर.
संरचना: २२ सामान्य द्वितीय आणि २ सामानासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या गाड्यांच्या सविस्तर वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.


