रावेरहुन पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्स बसमधून धूर; सुदैवाने ४० प्रवासी थोडक्यात बचावले

रावेर – रावेरहून पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गावरील पांढरी फुल घाट परिसरात २३ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली.
मात्र बस दुरुस्तीसाठी सुमारे तीन तास लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी झालेल्या विलंबामुळे आर्थिक नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत ट्रॅव्हल्स व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली.