संपामुळे तहसीलचे काम ठप्प, नागरिकांचा संताप : कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी केली घोषणाबाजी ;

.

भुसावळ (प्रतिनिधी) – प्रलंबित १६ मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.२१) बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे भुसावळ तहसील कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी तहसील आवारात शुकशुकाट होता. कर्मचारीच संपावर गेल्याने ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्यांची पंचाईत झाली. पदरी निराशा घेऊन त्यांना उन्हातच परतावे लागले. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या हाकेनुसार तहसील कार्यालयातील ४३, प्रांताधिकारी कार्यालयातील ६ आणि पंचायत समितीमधील १ अशा एकूण ५० कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात महसूल विभागाशी निगडित सहभाग नोंदवला आहे. यामुळे महत्त्वाची प्रमाणपत्रे, सातबारा दुरुस्ती, विविध योजनांचे अर्ज आणि जमिनीशी संबंधित प्रकरणांची सुनावणी थांबली आहे. तहसील कार्यालयातील सर्व विभाग रिकामे असताना केवळ संजय गांधी निराधार योजना विभागात एक ऑपरेटर महिलांची कागदपत्रे तपासताना दिसून आला. कर्मचारी नसल्याने केवळ नोंदणी करण्यापलीकडे कोणतीही ठोस आणि निराधार महिला तासनतास कार्यवाही होऊ शकली नाही. वृद्ध कर्मचाऱ्यांची वाट पाहून अखेर रिकाम्या हाताने परतल्या. मात्र, जातांना त्यांनी संताप केला