चाळीसगाव – तालुक्यातील बहाळ येथे २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.हरीष राजेंद्र जगताप (वय २८, रा. बहाळ कसबे, ता. चाळीसगाव) यांनी २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.

ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तात्काळ त्यांना खाली उतरवून उपचारासाठी मेहूणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


