आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरीही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

राज्यात २ आणि ३ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने या काळात हप्ते जमा होणार नाहीत. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो आणि निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
सध्या संकेत मिळत आहेत की, नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये दिला जाऊ शकतो. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात दोन्ही हप्ते एकत्र दिले गेले होते, त्यामुळे यावर्षीसुद्धा तसे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल.
महत्वाची सूचना: लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करणे आवश्यक आहे; जर केवायसी केले नाही तर पुढील हप्ता मिळणार नाही. केवायसी ऑनलाईन पद्धतीने सहज करता येईल.
महिला लाभार्थ्यांनी केवायसी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे आणि हप्त्यांच्या अद्ययावत माहितीसाठी अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी.


