भुसावळ (प्रतिनिधी ) येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळ, मराठी विभाग व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे,उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील, डॉ .जी.आर.वाणी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागाचे प्रा. सतिश अहिरे होते. ते यावेळी म्हणाले-आजच्या युगात महात्मा गांधी यांच्या विचारांची नितांत गरज आहे. गांधीजींनी जगाला सत्य आणि अहिंसेचा अद्वितीय संदेश दिला. समाजात वाढत चाललेली हिंसा, द्वेष आणि असमानता दूर करण्यासाठी त्यांच्या विचारांचा आधार घ्यावा लागेल. स्वच्छता, शिस्त आणि साधेपणाचे तत्त्व त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. अन्यायाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढा देणे हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. ‘स्वदेशी’चा मंत्र देऊन त्यांनी आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून दिले. गरीब आणि शोषितांची सेवा करणे हेच खऱ्या राष्ट्रनिर्माणाचे साधन आहे असे ते सांगत. पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे साधेपणाचे तत्त्व आजही मार्गदर्शक आहे. म्हणूनच गांधीजींचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या समाजासाठीही अत्यंत आवश्यक आहेत. चला, आपण सर्वजण त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात शांतता आणि ऐक्य निर्माण करूया. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीनानाथ पाठक, सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल इंगोले व आभार डॉ. मनोज पाटील यांनी केले . यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ राजेंद्र तायडे, डॉ. स्वाती महाजन, प्राध्यापिका वंदना महाजन, प्रा. गौतम भालेराव, प्रा. मनोहर गायकवाड, डॉ.सचिन राजपूत, कार्यालयीन अधीक्षक भगवान तायडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे,सोबत उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील उपप्राचार्य डॉ. जी आर वाणी


