नाहाटा महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन .

.भुसावळ (प्रतिनिधी ) येथील भुसावळ कला ,विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे ‘हिंदी सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी हिंदी सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . डी एन पाटील सर यांनी केले .तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रा .डॉ .मनोज पाटील यांनी केले. हिंदी सप्ताह अंतर्गत कथोपकथन, काव्यवाचन, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,पोस्टर प्रदर्शन आदी कार्यक्रम घेण्याबाबत माहिती दिली .

अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ . डी .एन . पाटील सर म्हणाले की, हिंदी भाषा सर्वांना समजणारी भाषा आहे .संपूर्ण भारतात बोलली जाणारी ही भाषा आहे . सामान्य व्यक्तीच्या संवेदना, भाव भाषेद्वारे व्यक्त होतात भाषाही अर्जित संपत्ती आहे . कबीरदास ,तुलसीदास, सूरदास, प्रेमचंद, दिनकर यांच्या माध्यमातून अहिंदी भाषेचा व्यक्ति ही हिंदी भाषेविषयी आवड निर्माण होते. हिंदी सप्ताहाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा डॉ राजेंद्र तायडे यांनी केले यावेळी विद्यार्थी – विद्यार्थींनी उपस्थित होते