भुसावळातील मेगा रक्तदान शिबिरात गुरुकुलमधील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान –

भुसावळ (प्रतिनिधी ) – : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल शाळेतर्फे संस्थाप्रमुख गोपाळ भगत यांच्यासह शिक्षकांनी भुसावळात मेगा रक्तदान शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदविला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शहरात या उपक्रमांतर्गत मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात श्री स्वामीनारायण गुरुकुलचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वतः रक्तदान करून सहभाग नोंदविला.

महारक्तदान शिबिर
भाजप भुसावळ विधानसभेतर्फे जय मातृभूमी चौक, प्रोफेसर कॉलनी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकल जैन समाज, भुसावळतर्फे तेरापंथ भवन येथे रक्तदान अमृत महोत्सव 2.0 पार पडला.

मानवतेसाठी रक्तदान हीच खरी सेवाया भावनेतून या शिबिराला गुरुकुल चा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रक्तपेढी, जळगाव यांनी सहकार्य केले.